अयोध्येतल्या व्यापाऱ्यांच्या खातेवह्या
मोदी सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०१९चा अर्थसंकल्प बॅगेतून आणण्याऐवजी लाल रंगाच्या कापडात बांधून आणला, संसदेत सादर केला. त्यावरून बरीच चर्चा होत आहे. त्यानिमित्तानं हिंदीतील प्रसिद्ध व्यंग्यलेखक हरिशंकर परसाई यांची ही एक व्यंग्यकथा. ही कथा बरीच जुनी आहे. परसाई हजारो वर्षांपूर्वीच्या मिथकांशी आपल्या कल्पना जोडून त्याद्वारे आजच्या सामाजिक विसंगतींवर भाष्य करणारे लेखक म्हणून ओळखले जातात.......